ज्योती कॉलेज एनएसएसतर्फे स्वच्छता मोहीम संपन्न
बेळगाव
केंद्र सरकारतर्फे दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमांतर्गत ज्योती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आज सकाळी नरगुंदकर भावे स्मारकाच्या ठिकाणी श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविली.
या अभियानात तेथील केरकचरा, झाडेझुडपे आणि रान काढून परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेमध्ये प्रा. डी. ए. निंबाळकर, प्रा. महेश जाधव, विनायक जाधव, निखिल, वेदांत, स्नेहल, मेहक, पल्लवी, जुली, रोहन, अमित पाटील, अतुल नंद्याळकर, आर. एस. पाटील, विनायक सावंत, संजय बंड यांच्यासह एनएसएस स्वयंसेवक व प्राध्यापक सहभागी झाले होते.