धर्मवीर संभाजी महाराज्यांच्या मूर्ती उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार अभय पाटील यांच्याकडून खासदार उदयनराजे भोसले यांना आमंत्रण….
सातारा:
धर्मवीर संभाजी चौक अनगोळ बेळगाव येथे उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी साताऱ्याचे खासदार, छत्रपती शिवाजी महाराजांचे 17 वे वंशज मा.उदयनराजे भोसले यांना आमंत्रित केले आहे.
शनिवारी अभय पाटील यांनी सातारा येथे उदयनराजे भोसले यांच्या राजवाड्याला भेट दिली,आणि त्यावेळी भारतातील सर्वात उंच असणाऱ्या अनगोळ बेळगांव येथील धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे उद्घाटन करण्यासाठी निमंत्रण दिले ,यावेळी मा. उदयनराजे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन ह्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले..