जगदीश शेट्टर यांचे एका वर्षात दोनदा घर वापसी ?
बेळगाव :
जगदीश शेट्टर यांनी भाजप सोडून काँग्रेस प्रवेश केले होते आणि लोकसभा निवडणुकीच्या आधी घर वापसी केले आणि परत भाजप चे उमेदवार म्हणून बेळगावात निवडून सुध्दा आले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार शेट्टर यांनी बेळगावात भाड्याने घर घेतले होते. आता ती अचानक रिकामी झाली असून शेट्टर राहत असलेले घर मालकाने भाड्याने दिले आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळर यांनी शेट्टर यांचा बेळगावचा पत्ता कुठे आहे, अशी विचारले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेला गेला होता. मी बेळगावला स्थायिक झालो असून कायमचा पत्ता आहे, असे उत्तर शेट्टर यांनी दिले. पण, ‘धारवाड माझी जन्मभूमी पण बेळगाव ही माझी कर्मभूमी आहे’ असे विधान करणारे बेळगावचे निवडून आलेले खासदार जगदीश शेट्टा यांनी आता भाड्याचे घर रिकामे केले आहे.
काही सोशल मीडियावर असे ही म्हटले आहे की ते नवीन घर विकत घेत आहेत .पण नवीन घर घेण्या अगोदर घर रिकामी का केले अस ही चर्चा आहे.एकंदरीत शेट्टर यांचा दोनदा घर वापसी होणार की बेळगाव येथे स्थाईक होणार हे लवकरच कळेल…