नितीन जाधव यांच्या नेतृत्त्वात वॉर्ड क्र.29 मध्ये लोकसभा निवडणुकी प्रचाराला सुरु.
बेळगाव:
नगरसेवक नितीन जाधव यांनी आपल्या वार्ड क्रमांक 29 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला केली सुरुवात माननीय आमदार अभय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपल्या वॉर्ड मध्ये नागरिकांच्या भेटी घेऊन नरेंद्र मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांना समजावून सांगितले.
येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करून, मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवू असे नागरिकांना सांगितले. नितीन जाधव हे आपल्या वार्डमधील विविध भागांमध्ये रोज भेटी घेऊन नागरिकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदान करायला आव्हान करणार आहेत.