यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे गरजूंना तांदळाचे वाटप
यंग बेळगाव फाउंडेशनतर्फे जय भारतमाता नगर, ग्रामीण भागातील गरजू आणि महापालिकेच्या निराश्रीत आश्रय केंद्राला 100 किलो तांदळाच्या पिशव्यांची मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. यंग बेळगाव फाउंडेशनच्यावतीने समाजसेवक ॲलन विजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य अद्वैत चव्हाण -पाटील, संदीप सोमनत्ती, आदित्य गावडे, लकी सोलंकी, जय श्रेकर, नितीन कोटारी आदींनी स्थानिक लोकांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला. याबद्दल संबंधित रहिवासी आणि निराश्रीतांच्या आश्रय केंद्र व्यवस्थापनाने कृतज्ञता व्यक्त करून यंग बेळगाव फाउंडेशनचे आभार मानले.