उपसभापती पदासाठी आ. अभय पाटील यांना संधी
बेळगाव : प्रतिनिधी
आ. अभय पाटील हे विधानसभेवर 3 वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. तसेच त्यांनी सरकारच्या विकासकामांची कार्यवाही करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे बेळगावात होणाऱ्या अधिवेशनाच्या वेळी त्यांना उपसभापती पदाची संधी लाभणार असल्याचे विशेष सूत्रांकडून सांगण्यात आले.
कर्नाटक राज्य विधानसभेच्या उपसभापती पदासाठी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांची नियुक्ती निश्चित करण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी सदर पदाची जबाबदरी सांभाळणारे सौंदत्तीचे आ. आनंद मामनी यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. त्यामुळे या पदासाठी योग्य सदस्य म्हणून आ. अभय पाटील यांना संधी देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आ. अभय पाटील हे विधानसभेवर 3 वेळा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. तसेच त्यांनी सरकारच्या विकासकामांची कार्यवाही करण्याचा धडाका लावला आहे. त्यामुळे बेळगावात होणाऱ्या अधिवेशनाच्या वेळी त्यांना उपसभापती पदाची संधी लाभणार असल्याचे विशेष सूत्रांकडून सांगण्यात आले.
Yes He is doing excellent job in ward 54
And he should get this grabbed this opportunity
Not to miss.
All the best
Abhay patil saheb up sabhapati sathi yogy ahet
Very good news he is our dashing and strong condidate of Belgaum All the very best Sir