दुष्काळाचा परिणाम वीजउत्पादनावर; सरकारवर पुढे आव्हान
बेळगाव:
कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारसमोर विविध आव्हाने आहेत. त्यातच यंदा पाऊस न झाल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून वीजउत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्नाटक सरकारसमोर विजेचा तुटवडा होऊ न देण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
यापुढे उद्योग आणि घरगुती वापरासाठी वीज कपात होणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतेच जाहीर केले आहे. सध्या ठिकठिकाणी शेतीची भिस्त सिंचनावर आहे आणि राज्यात सिंचन पंपसेटला (आयपी) सात तास वीज देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणेच बेळगाव जिल्ह्याचीही परिस्थिती आहे. उद्योग आणि शेती यावरच भवितव्य अवलंबून असल्याने सरकार दिलेली आश्वासने कशी पूर्ण करणार यावर बरेच काही अवलंबून आहे.