*गुन्हा नोंदीपासून एकाचीच सुटका*… *कोणाला आहे यांचा पुळका?*
बेळगाव:
समस्त सीमाभागातील आम्ही मराठी बांधवांनी आपल्या तळमळीच्या सीमा प्रश्नासाठी एक नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळला. अर्थात सीमा लढ्याच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर असणाऱ्या खंबीर नेतृत्वाला याचे फळ भोगावे लागले आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
मात्र या गुन्हा नोंदविण्याचा प्रक्रियेतून एका स्वयंघोषित नेत्याची सुटका कशी झाली हे गौडबंगाल कळत नाही. त्यांच्यावर तेवढाच गुन्हा नोंदविला जाऊ नये अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनात हिरीरीने पुढाकार घेऊन सहभागी होणाऱ्या या नेत्याने काळे दिनाच्या आंदोलनात मात्र भूमिका कशी घेतली हे कळत नाही. या काळ्या दिनाच्या फेरीमध्ये उशिराने आगमन करून त्यानंतर फक्त सभेत व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली होती.
सध्या फक्त आपले पालक सांगतील तेच करायचे असे या बालकाने ठरवले आहे की काय अशी शंका मराठी भाषिकांना येणं स्वाभाविक आहे. सीमावासियांचा कैवार घेतलेल्या अशा नेत्याच्या दुटप्पीपणाचा अनुभव आता सीमा बांधवांना घेण्याची वेळ आली आहे.