आ. अभय पाटील यांच्या घरासमोर विजयोत्सव साजरा
बेळगाव : प्रतिनिधी
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविले आहे. याचा विजयोत्सव शहरात विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. होसूर येथे आ. अभय पाटील यांच्या निवासस्थनासमोर जल्लोष करून विजयोत्सव साजरा झाला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. तसेच मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला.
गुजरात निवडणुकीतील विजय हा लक्षवेधी स्वरूपाचा आहे. यामध्ये जनतेने भाजपवरील विश्वास पुन्हा एकदा प्रकट केला आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकात देखील भाजपच्या विजयाची ही नांदी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या विजयोत्सवाप्रसंगी नगरसेवक जयंत जाधव,गिरीष धोंगडी, अभिजित जवळकर, नंदू मिरजकर, मंगेश पवार, सारिका पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.