सुहासिनी महिला मंडळ तर्फे मंगळागौरीचा बहारदार खेळ रंगला
बेळगाव : प्रतिनिधी
कधी झिम्मा खेळत साऱ्यांना आपल्या तालावर नाचायला लावणे तर कधी फुगड्या खेळून कसरतींचे दर्शन घडविणे अशा बहारदार खेळांचे सादरीकरण पटवर्धन लेआऊट येथील सुहासिनी महिला मंडळ तर्फे, जिवेश्र्वर भवन,सोनार गल्ली, वडगाव,येथे आयोजित करण्यात आले.
संपूर्ण श्रावण महिन्यात होणारा मंगळागौरीचा सोहळा या समुहाच्या कौशल्य पूर्ण खेळांनी साजरा झाला. त्यामुळे या समुहातील सहभागी महिलांचे विशेष कौतुक झाले. सुहासिनी महिला मंंडळ कडून झिम्मा, फुगड्या, लाटण्याचे खेळ, सुपाचे खेळ, फुलपाखरू अशा सर्व खेळांचे सादरीकरण करण्यात आले होते.
श्रावण महिन्यात महिला वर्गासाठी येणारी विशेष पर्वणी म्हणजे मंगळागौरीचा सोहळा असतो. या मंगळागौरीचे खेळ खेळत परंपरेची जपणूक करणे बेळगावातील महिलांचा समूह करीत आहे. सध्याच्या मंगळागौरीच्या उत्सवामध्ये त्यांचे कौशल्य नावाजले जात आहे.या समुहाने आपल्या मंगळागौरींचे बहारदार खेळाने सर्वांना थक्क केले.
या कार्यक्रमाला सुहासिनी महिला मंडळचे अध्यक्षा विद्या तोपिनकटटी, उपाध्यक्ष नंदिनी चौगुले,सेक्रेटरी वृंदा तडकोड, यांच्यासह पाहुणे आरती कानगो ,पतंजली उत्तर कर्नाटक महिला राज्य प्रभारी,रिटायर्ड मुख्याध्यापिका.प्रतिभा सडकेवर,चार्टर्ड अकाऊटंट वनिता बिर्जे, व्यासपीठावर उपस्थित होते.सुत्रसंचलन आदिती शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन नंदिनी चौगुले याांनी सांभाळले.