बेळगावात सोन्याची चेन पळविणाऱ्या टोळी अटक.
बेळगावात सोन्याची चेन पळविणाऱ्या टोळी अटक.
बेळगाव :
किल्ला भाजी मार्केटजवळ अडीच तोळ्याची चेन पळविणाऱ्या त्रिकुटाला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून चेन जप्त करण्यात आली आहे. मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
किल्ला भाजी मार्केटजवळ तिघा जणांनी गळ्यातील चेन हिसकावून घेऊन पलायन केले होते. या प्रकरणी दस्तगीर जमादार, आसिफ यळळूरकर व संदेश जाधव या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. हे शिवाजीनगर व कणबर्गी परिसरातील राहणारे आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.