महिला विद्यालय ‘इंटरॅक्ट’चा अधिकार ग्रहण
बेळगाव:
महिला विद्यालय मराठी माध्यमिक शाळेतील इंटरॅक्ट क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. कॉलेज रोडवरील महिला विद्यालय शाळेमध्ये आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर हे होते. यावेळी तेजस्विनी देशपांडे हिला अध्यक्ष तर राधा मुचंडी हिला सचिव म्हणून तसेच अन्य विद्यार्थ्यांना अधिकार पदाची सूत्रे प्रदान करण्यात आली. स्वाती कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरण अभ्यासाचे महत्त्व विशद करण्याबरोबरच जीवनात अन्य छंद जोपासणे, नेतृत्व गुण अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एच. एम. पाटील, इंट्रॅक्ट शिक्षिका एम. बी. होनगेकर, रोटरीचे मनोज मायकल, विशाल पट्टणशेट्टी, दीपक काटवा आदींसह शाळेचा शिक्षक वर्ग आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.