बेळगाव : कर्नाटक संरक्षण मंचाच्या कार्यकर्ते बेळगावात खुली सभा घेण्यासाठी शहराकडे निघाले असता त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 4 वरून धावणाऱ्या 6 हून अधिक महाराष्ट्र नोंदणीकृत लॉरींवर दगडफेक करून संताप व्यक्त केला.
पुण्याहून बेंगळुरूकडे जाणाऱ्या महाराष्ट्र नोंदणीकृत वाहनावर कर्नाटक संरक्षण मंचाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.यावेळी महाराष्ट्र नोंदणीची अनेक वाहनांचे नुकसान करून रोष व्यक्त केला.शिवाय, त्यांनी महाराष्ट्र नोंदणी फलकावर काळी शाई फेकून संताप व्यक्त केलं.
कर्नाटक संरक्षण मंचाच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने बेळगावकडे रवाना झाले असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.