नीतीन जाधव यांच्या कडून हिंदवाडी येथे अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा
बेळगाव : प्रतिनिधी
दक्षिण विभागातील , वॉर्ड क्र.29 मधील,हिंदवाडी रहिवासी, दिलीपसिंग स हजारे यांच्या घरची एक भिंत बुधवारी रात्री कोसळल्याने खूप नुकसान झाले आहे. नगरसेवक नितिन जाधव यांना हि बातमी समजताच संबंधीत अधिकारीना घेऊन त्या घरी भेट दीली व झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांची विचारपूस करून लवकरात लवकर लुक्सान भरपाई मीळऊन देऊ असे सांगितले.
बेळगाव शहर आणि परिसरात मागील आठ दिवसात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये जुन्या घरांची पडझड देखील झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
नगरसेवक नितीन जाधव यांच्या या कामाचा सर्वत्र कौतुक होत आहे आणि हजारे कुटुंबीयांनी त्यांचे आभार म्हणून समाधान व्यक्त केले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता किरण मन्निकेरी. परशुराम जाधव कार्य निरीक्षक,. महसूल निरीक्षक अमित येळकर,तलाठी शिंदे, भाजपचे कार्यकर्ते भरमगौडा पाटील , व इतर प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.