महिलांनी आत्मनिर्भर असावेत:एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके

महिलांनी आत्मनिर्भर असावेत:एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके

बेळगाव :

महिलांना काम मिळावे तसेच त्यानी आत्मनिर्भर होऊन आपल्या पायावर उभे राहावे या उद्देशाने एंजल फाउंडेशनच्या वतीने महिलांना शिवणकाम, विणकाम तसेच पापड तयार करणे याशिवाय विविध कामांविषयी माहिती देण्यात आली.

सर्व महिलांना रोजगार मिळावा याकरिता एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी शहरांमध्ये महिलांना रोजगार देण्याकरिता बैठका सुरू केल्या आहेत.

यावेळी महिला मंडळ सोबत त्यांनी चर्चा केल्या आणि कशाप्रकारे आपण काम करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती दिली

.यावेळी  श्री रेणुका देवी महिला मंडळ, श्री लक्ष्मी महिला मंडळ, श्री साई महिला मंडळ, श्री दुर्गा दुर्गाश्वरी महिला मंडळ, समर्थ महिला मंडळ, रिद्धी सिद्धी महिला मंडळ या मंडळामधील सर्व महिलांना त्यांनी मार्गदर्शन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post मैनाबाई फॉउंडेशनकडून कॉन्स्टेबल काशिनाथ इरगार यांचा गौरव
Next post अर्भकामध्ये लिव्हर ट्यूमर काढणे, KLE हॉस्पिटलमध्ये एक दुर्मिळ शस्त्रक्रिया- उत्तर कर्नाटकातील पहिली.