मैनाबाई फॉउंडेशन कडून कॉन्स्टेबल काशिनाथ इरगार यांचा गौरव
बेळगाव:
दोन दिवसांपूर्वी किल्ला तलावात मानसिक अवस्थेत आत्महत्या करायला गेलेल्या महिलेचे प्राण वाचविलेल्या रहदारी वाहतूक दक्षिण पोलीस स्थानकाचे पोलीस काशिनाथ इरगार यांच्या कार्याचे कौतुक आज मैनाबाई फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
मैनाबाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवा चौगुले यांनी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना भेटून त्यांच्या सन्मान केला यावेळी शाल आणि पुष्पहार घालून त्यांचा गौरव शिवा चौगुले यांनी केला आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की काशिनाथ यांचा आदर्श सर्व पोलिसांनी घेण्यासारखे आहे त्यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे समाजातील आपल्या बहिणीचे प्राण वाचविले आहे त्यांची कार्यतत्परता त्यांनी आपल्या कामांमध्ये अशीच ठेवावे आणि असे काम वेळोवेळी करावे असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले