राकसकोप जलाशयाचे पाणी पातळीत मोठी वाढ ,दोन दरवाजे उघडले
राकसकोप जलाशयाचे पाणी पातळीत मोठी वाढ ,दोन दरवाजे उघडले
बेळगाव :
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत काल सोमवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे सोमवारी दुपारी तीन वाजता जलाशयाचे दोन दरवाजे दोन इंचांनी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे मार्कंडेय नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जलाशय तुडुंब भरण्यास अजून दोन फूट पाणी गरजेचे आहे.