खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना आज सुट्टी!
खानापूर तालुक्यातील प्राथमिक-उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना आज सुट्टी!
बेळगाव :
खानापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे मंगळवारी (25 जुलै) खानापूर तालुक्यातील प्राथमिक- उच्च माध्यमिक शाळा आणि पीयू महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.
खानापुरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा आणि पीयू महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.