आ.अभय पाटील यांच्या कडून मच्छे नगरपंचायतीच्या स्वच्छतेसाठी चार वाहनांची सुविधा.
बेळगाव :
मच्छे नगरपंचायत क्षेत्रातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील यांनी पाऊल उचलले आहे .या मतदारसंघासाठी आता 1 सकिंग मशिन, 1 जेसीबी, 1 ट्रॅक्टर आणि 1 कचरा संकलन वाहन आज मच्छे पट्टण पंचायतीकडे सुपूर्द करण्यात आले, मच्छे पट्टण पंचायतीला, राज्य वित्त आयोग निधीच्या, स्वच्छ भारत मशीन 2.0 च्या अंतर्गत , सुमारे 90 लाख रुपये खर्च आला.
मच्छे गावातील सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी सकिंग मशिन मदत करतील आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी इतर वाहने ही एक जोड असेल या आदी 32 लाख रुपये खर्चाची चार वाहने उपलब्ध करून देण्यात आली होते.
त्यामुळे मच्छे नगरपंचायत क्षेत्रातील स्वच्छता व्यवस्था सुलभ होणार आहे . या पुढील काळात नगरपंचायत म्हणून मच्छे विभागाचा विकास करण्यात येणार आहे . याचा नागरिकांनी लाभ घ्यावा . तसेच संपूर्ण मच्छे ग्राम स्वच्छ ठेवण्यासाठी दक्ष राहावे असे मार्गदर्शन अभय पाटील यांनी केले.