असहाय्य युवकाला मानवाधिकार संघटनेकडून मदत्त.
बेळगाव:
गुरूवारी 13 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मानवाधिकार सदस्य सूरज काळे यांना समजले की शहर बसस्थानकाजवळ एक रुग्ण पडून आहे आणि थरथर कापत आहे, त्यांनी 108 ला कॉल करून त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे अॅडमिट केले. संध्याकाळी 6:10 वाजता रुग्णाने सूरजला फोन केला की त्याला डिस्चार्ज दिलं गेलं आणि कर्मचाऱ्यांनी त्याला बेड सोडण्यास भाग पाडले.
मानवाधिकार सदस्य राम बनवानी यांनी लगेचच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रूग्णाची स्वतः भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. परंतु डॉक्टर आणि अधिकारी त्यांना सहकार्य करत नव्हते असे श्री.राम बनवानी म्हणाले.