
शालेय वाहन उलटले; मुले सुदैवाने बचावली
शालेय वाहन उलटले; मुले सुदैवाने बचावली
बेळगाव :
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगळा तालुक्यातील हरगोप्पाजवळ शालेय वाहन पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पडले.शालेय वाहनातील ३५ मुले सुदैवाने बचावली. काही मुलांना किरकोळ दुखापत झाली.
मारकुंबीच्या गणाचारी शैक्षणिक संस्थेचे हे शालेय वाहन असून, मुलांना घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते पलटी होऊन रस्त्यालगतच्या रिकाम्या जागेत पडले.