बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार
बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार
बेळगाव :
बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे. बेळगाव उत्तर विभागामध्ये बेळगावसह विजयपुर, धारवाड, बागलकोट आणि गदग या जिल्ह्यांचा समावेश आहे. बेळगाव पोली आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या यांच्या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले आहे. बेळगाव पोलीस आयुक्त हे पद डीआयजी स्तरावर असते.