मानव अधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी फोरमचे महापालिका आयुक्तांना निवेदन

मानव अधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी फोरमचे महापालिका आयुक्तांना निवेदन 

 

बेळगाव महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये स्थानिकांची प्रभाग समिती स्थापन करा !

बेळगाव:

कर्नाटक राज्य महानगरपालिका कायद्यानुसार बेळगाव महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड मध्ये स्थानिक लोकांची प्रभाग समिती (वॉर्ड कमिटी) स्थापन करावी मागणी मानव अधिकार आणि भ्रष्टाचार विरोधी फोरमने केली आहे.

आज दि. २६ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजून ४५ मि. फोरमच्यावतीने महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांना सदर मागणीचे निवेदन सादर करून प्रभाग समिती स्थापन करण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी बेळगाव शहर आणि तालुका संघटनेचे अध्यक्ष महांतेश होलीकट्टी,पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता प्रमोद गुंजीकर, राजेश देवटगी, सदानंद जाधव संघटनेचे इतर सभासद आणि बेळगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post खानापूरात युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
Next post बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार