विवाह होऊन केवळ एक महिना झालेल्या नवविवाहित युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.गुरुवारी रात्री गणेशपुर येथे सदर घडली आहे.प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29, मूळचा रा.कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
प्रतिक आर्किटेक्ट होता एका महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता गुरुवारी रात्री गणेशपुर येथील राहत्या घरी त्याने गळफास घेतला होता त्याच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ बहिण असा परिवार आहे शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर यांचे ते चिरंजीव होते.
मिळालेल्या माहितनुसार घरातील सर्व मंडळी खोलीत असताना युवकाने अचानक दुसऱ्या खोलीत गळफास लावून घेतला त्याच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता कोनवाळ गल्ली येथील राहत्या घरातून त्याची अंत्ययात्रा सदाशिवनगर स्मशान भूमिकडे निघणार आहे.
घटनेची माहिती कळताच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिरोळकर कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी कॅम्प पोलिसात गुन्हा नोंद झाला असून नेमकी प्रतीकने आत्महत्या
कशासाठी केली याचा तपास सुरू आहे.