बेळगाव :
बेळगाव महापालिका आयुक्त पदी केएएस अधिकारी अशोक धुडगुंटी यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने बजावला असून मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांची बदली अन्यत्र करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या अधीन कार्यदर्शिनी शुक्रवारी हा नियुक्तीचा आदेश बजावला आहे. अशोक धुडगुंटी यांनी या अगोदर निवासी जिल्हाधिकारी म्हणून बेळगावात सेवा बजावली होती. महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या धुडगुंटी यांच्यावर यापूर्वी पाळेमुळे रुजविणाऱ्या अधिकाऱ्यांचा काटा काढला असल्याचे सर्वश्रुत आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करून एडीसी पदावर असताना अशोक धुडगुंटी यांच्यावर पडद्याआडून राजकारण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे योग्य असल्याची चर्चा महामंडळात रंगली आहे.