आ. अभय पाटील यांनी टीलकवाडी येथे 45 लाख रू. ड्रेनेज कामांला चालना दिली.
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव दक्षिण मतदार संघात येणाऱ्या टीलकवाडी येथील लेले ग्राउंड आणि परीसर ठिकाणच्या ड्रेनेज पाईपलाईन खूप दिवांपासून खराब झाले होते .नागरिकांनी आ.अभय पाटील यांच्या लक्षात आणून दिले आणि आ.अभय पाटील यांनी आज शनिवारी नवीन ड्रेनेज कामाला चालना दिली.
संपूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील ड्रेनेज व्यवस्था सुधारण्याची मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या पुढील काळात समस्या उद्भवणार नाहीत, असा विश्वास दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी व्यक्त केला. या माध्यमातून ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी काही ठिकाणी नव्या पाईपलाईन देखील घालण्यात येत आहेत.
एकूण 45 लाख रुपये खर्चाची विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. निश्चित कालावधीत कामे पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आ. अभय पाटील यांनी दिली.