माझे जीवन, स्वच्छ शहर अभियानास बेळगावात प्रारंभ
बेळगाव :
केंद्रीय गृह आणि नगर विकास खात्याने सुरु केलेल्या स्वच्छ भारत मिशन शहर अभियानाला बेळगावचे महापौर सौ. शोभा सोमंनाचे यांच्या हस्ते भाग्यनगर, 5वा क्रॉस,येथे चालना देण्यात आला.
या अभियानाला ‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर अभियान’ असे नाव देण्यात आले आहे. यांतर्गत ५ जूनपर्यंत पुनर्वापरयोग्य वस्तूंचे शहरात बारा ठिकाणी संकलन करण्यात येत आहे.अभियानांतर्गत प्लास्टिकच्या वस्तू, जुनी पुस्तके, जुने कपडे, पादत्राणे व पुनर्वापर होईल अशा अन्य वस्तूंचे संकलन केले जात आहे.
त्यासाठी शहरात १२ ठिकाणी संकलन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांना “आरआरआर “(रेड्यूस, रीयूज व रिसायकल) असे नावही देण्यात आले आहे. ही केंद्रे २० मे ते ५ जून या काळात सुरू राहणार आहेत.कार्यक्रमाल नगरसेवक अभिजीत जवळकर, सौ. वाणी जोशी, डॉ.अनिल बोर्गवी आणि इतर मान्यवर उपसथित होते.