बेळगाव –
बेळगाव दक्षिण मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचाराचा प्रभाव दिवसेंदिवस वाडत आहे .मंगळवारी झालेल्या भव्य रोडशोद्वारे त्यांच्या प्रचाराचे वादळ दक्षिण मध्ये घोंगावल. मागील काही दिवसापासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरू लागला आहे. अभय पाटील यांनी केलेले विविध विकास कामे आणि जनतेकडून मिळणारा वाढता पाठिंबा यांच्या जोरावर अभय पाटील यांची आगेकूच सुरू आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारार्थ आज मंगळवारी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. केशव प्रसाद मौर्य बेळगावला आले आहेत. डॉ. केशव प्रसाद मोर्य यांनी मंगळवारी दिवसभर दक्षिण मतदार संघातील विविध ठिकाणी जाऊन मतदार आणि मान्यवरांच्या भेटी घेतल्या आहेत.
सायंकाळी वडगाव सपार गल्ली येथून आयोजित करण्यात आलेल्या रोड शोमध्येही ते सहभागी झाले. रोड शो दरम्यान केशव प्रसाद मोर्य यांनी अभय पाटील यांना विजयी करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. रोड शो मध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.