बेळगाव:
बेळगाव दक्षिणचे उमेदवार अभय पाटील यांनी केलेल्या विकासकामांचा आवाका पाहता येथील जनतेकडून त्यांना निश्चितच भरघोस पाठिंबा मिळेल आणि ते विजयी होतील, असा विश्वास उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी व्यक्त केला.भारतीय जनता पक्षाचे एकच मंत्र आहे आणि ते विकासाचा मंत्र आहे. त्यामधून सामान्य जनतेची विविध समस्यांपासून सोडवणूक होत आहे. त्यामुळे भाजपचा राज्यातील विजय निश्चित आहे. मंगळवारी सकाळी अभय पाटील यांच्यासह त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपले विचार मांडले. सामान्य नागरिकांसाठी आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे, ते पूर्ण करण्यासाठी अभय पाटील यांनी आपल्या आमदारकीच्या कालावधीत मोठे कार्य केले आहे. याची कल्पना मतदारांना आहे. त्यामुळे आपण त्यांच्या विजयाबद्दल निश्चिंत आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अयोध्येतील राममंदिराचे काम दि. 14 जानेवारी पूर्वी पूर्ण होणार असल्याचे सांगितले.