आ.अभय पाटील यांच्या प्रयत्नाने मच्चे व पूरणवाडी पुन्हा ग्रॅमपंचायत म्हणून घोषित होणार.
बेळगाव:
काही वर्षांपूर्वी माचे व पुरणवाडी या ग्रामपंचायती होत्या .तेव्हा पट्टण पंचायत म्हणून घोषित व्हावे असे लोकांना वाटत होते ,त्या प्रमाणे कार्यवाही करून पट्टण पंचायत म्हणून घोषित केले गेले.आता गेल्या एक वर्षापासून पुन्हा ग्रामपंचायत म्हणून घोषित व्हावे अशी विनंती रहिवाश्यांनी, आ.अभय पाटील यांच्याकडे केली होती .त्यामुळे अभय पाटील यांनी हा मुद्दा उचलून धरला व सर्व विभागांकडे पाठपुरावा करून , अखेर त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी 28 मार्चपूर्वी आदेश जारी करणार असल्याचे सांगितले.