बेळगाव जिल्ह्याला नेहमीच कर्नाटक सरकार तर्फे सावत्रपणाची वागणूक:आम आदमी पक्षाचे आरोप
बेळगाव : बेळगाव जिल्ह्याला नेहमीच कर्नाटक सरकारनेसावत्रपणाची वागणूक दिली जाते. स्मार्टसिटी असलेल्या.बेळगाव शहराला तसेच जिल्ह्याला डावलून हुबळी धारवाड, कुलबुर्गी, बंगळूरु आणि मंगळूरच्या हद्दीत हायटेक सिटी उभारण्याची घोषणा करून बेळगाव
जिल्ह्याला सावत्रपणाची वागणूक दिली आहे, अशी खंत आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार टोपन्नावर यांनी व्यक्त
केली आहे.कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा निषेधार्थ आम आदमी पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.यावेळी बोलतांना राजकुमार टोपन्नावर म्हणाले,अलीकडेच आयोजित केलेल्या सिल्व्हर फेस्टिव्हल ऑफ
बेंगळूर टेक्नॉलॉजी समिटमध्ये ज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी बेळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये हायटेक सिटी उभारण्याची घोषणा केली. बंगळुरूमध्ये
मंत्री बसवराज बोम्माई बेळगाववर केवळ हायटेक सिटीच नव्हे तर स्टार्ट-अप क्लस्टरच्या बाबतीतही अन्याय केला
आहे.
हुबळी-धारवाड आणि बेळगाव मिळून क्लस्टर बांधले.त्याचे सर्व कार्यक्रम व प्रकल्प केवळ हुबळी-धारवाडला जात असून बेळगावात येत नाहीत. बेळगाव जिल्ह्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्सची
घोषणा करण्यात आली असून तेसुद्धा हुबळी-धारवाडमध्ये पळवले जात आहे. बंगळुरू ते हुबळीपर्यंत फक्त भारत रेल्वे सुरू झाली आहे. ती बेळगावपर्यंत सुरु केली असती तर त्याचा फायदा इथल्या लोकांना झाला असता. 100
एकर स्टार्ट अप लाँच पॅड बेळगावला न देता हुबळी धारवाडला देण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली. राज्य सरकारच्या कराचा विचार केला तर राज्यात कर भरण्यात बेळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. वैद्यकीय सुविधा आणि सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 53 लाख आहे. कमी बेडची
सोय आहे. येथे येणारे अनेक प्रकल्प हुबळी- धारवाड जिल्ह्यात नेले जात आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेळगाव जिल्ह्याला नव्हे तर हुबळी – धारवाड, तुमकूरला विशेष प्रोत्साहन देण्यात आले. हुबळी-धारवाड जिल्ह्याच्या विकासाला आमचा विरोध नाही. पण बेळगाव जिल्ह्यालाही अधिक महत्त्व दिले पाहिजे. हुबळी-धारवाडला विशेष गुंतवणूक क्षेत्रातही
बेळगावला अन्यायकारक वागणूक मिळाली आहे.
बेळगावकडे दुर्लक्ष करून हुबळी – धारवाडलाही हायटेक सिटी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यापूर्वी बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून काम
पाहिले आहे. बेळगावच्या जनतेशी त्यांचं एक अतूट नातं आहे. बेळगावची सर्वसमावेशक माहिती जाणून घ्या. मुख्यमंत्र्यांवर जिल्ह्यातील जनतेच्या खूप आशा होत्या.
बेळगावसाठी नवीन प्रकल्प तातडीने जाहीर करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनात आम आदमी पक्षाचे शंकर हेगडे, अस्लम तहसीलदार, सुदर्शन शिंदे, शब्बीर मुल्ला, , रवींद्र बेल्लद आदी नेते उपस्थित होते.