सुवर्णसौध सारखा पायाभूत सुविधा बरोबर उद्योगधंद्ये हवेत
आ. अभय पाटील : मोठ्या उद्योगांसाठी विशेष अनुदानाची मागणी
बेळगाव :
बेळगावात पायाभूत सुविधा बांधले म्हणून विकास होणार नाही. येथे मोठमोठे उद्योगधंदे येण्याची गरज आहे, अशी अपेक्षा आ. अभय पाटील बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील यांनी व्यक्त केली.ते म्हणाले, बेळगावात स्वातंत्रपूर्व
काळापासून विभागीय कार्यालये आहेत. मोठमोठ्या उद्योगांसाठी येथील वातावरणदेखील अनुकूल आहे.
तत्कालीन मुंबई कर्नाटक प्रांतातही बेळगावला अनन्यसाधारण महत्व होते. परंतु, कालानुरूप येथे उद्योग उभारणीसाठी अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहेत. पूर्वी ह्या समस्यांमुळे
मोठे उद्योग एक तर अन्य जिल्ह्यात अथवा परराज्यात गेलेले आहेत. येथे उद्योग उभारणीसाठी प्राधान्य दिले पाहिजे. ते म्हणाले लवकरच मोठे उद्योग बेळगाव मध्ये सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे.विशेष करून आयटी पार्क सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.येण्याची गरज आहे. बेळगावलाही विशेष
अनुदान देऊन ,उद्योग निर्माण करा स्थानिक तसेच
जिल्ह्यातील तरुणांना नोकऱ्या द्या.फक्त सुवर्णसौध बांधले म्हणून येथील समस्या सुटणार नाहीत, तर उद्योग
निर्मितीसाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.
पूर्ण कर्नाटकात दोन-तीन गावे म्हणजे संपूर्ण राज्य होणार नाही.
बेळगावलाही विशेष दर्जा देऊन.येथे उद्योग निर्माण व्हायला हवेत.आता भाजपची ताकद केंद्रात आणि
राज्यातदेखील आहे. त्यामुळे ही सीमाभागातील बेळगाव
जिल्ह्याकडे ६० वर्षांत कोणीही फारसे लक्ष दिलेले नाही. कोणत्याही मुख्यमंत्र्याने वेळगावला विशेष निधी दिलेला नाही. परंतु, येडियुराप्पा.मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लक्ष
दिले. यानंतर जगदीश शेट्टर, सदानंद गौडा व आता बसवराज बोम्मई देखील बेळगावसाठी विशेष अनुदान देत आहेत. त्यांनी आता येथे उद्योग उभारणीसाठीही पुढाकार घ्यावा, असे
आ. अभय पाटील म्हणाले.