आ.अभय पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले “शिवचरित्र” प्रकल्पाचे लोकार्पण 16 मार्चला.

आ.अभय पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले “शिवचरित्र” प्रकल्पाचे लोकार्पण 16 मार्चला.

बेळगाव : प्रतिनिधी

डॉ. एस.पी.एम. रोड येथील छत्रपती शिवाजी उद्यानाशेजारी उभारण्यात आलेल्या  शिवचरित्र प्रकल्पाचे लोकार्पण  केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत,गुरुवार दि 16 मार्च 2023 रोजी, होणार आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे चरित्र सामान्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अनेक स्फूर्तीदायक प्रसंग जाणून घेण्याकरिता या प्रकल्पाला नागरीक नियमित भेट देतील.

उत्कृष्ट पद्धतीच्या चित्रकृती तसेच दर्जेदार असा लाईट अँड साउंड शो हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. माध्यमांशी बोलताना आ. अभय पाटील यांनी हा प्रकल्प एक आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. सदर प्रकल्प उभारणीसाठी आमदार निधी तसेच बुडा निधीमधून खर्च करण्यात आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

बेळगांवातील समस्त शिव भक्तानी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.अभय पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post ಸಹಕಾರಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಪ್ರಗತಿಗೆ ಬಿಜೆಪಿ ಹಲವು ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೊಳಿಸಲಿದೆ: ಕೇಂದ್ರ ಸಹಕಾರಿ ಸಚಿವ ಬಿ.ಎಲ್.ವರ್ಮಾ
Next post ಶಾ.ಅಭಯ ಪಾಟೀಲರ ಪರಿಕಲ್ಪನೆಯಿಂದ ಸಾಕಾರಗೊಂಡ “ಶಿವಚರಿತ್ರೆ” ಯೋಜನೆ ಮಾರ್ಚ್ 16ರಂದು ಲೋಕಾರ್ಪಣೆ.