वाहनाच्या धडकेत एक जण ठार ,एक जख्मी.

वाहनाच्या धडकेत एक जण ठार ,एक जख्मी.

 

बेळगाव :

दुचाकीवरून निघालेल्या दोघांना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी गावानजीक घडली.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालक युवकाचे नाव अरुण कोलते (वय 22) असे असून गंभीर जखमीचे नाव विशाल मारुती मन्नोळकर (वय 26) आहे. हे दोघे आपल्या दुचाकीवरून घराकडे जात असताना आंबेवाडी गावानजीक काल रविवारी रात्री 11:40 वाजण्याच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

ही धडक इतकी जोराची होती की अरुण जागीच ठार झाला.या अपघातात दुचाकीवर अरुणच्या मागे बसलेला विशाल मन्नोळकर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.काकती पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post सारथीनगर येथील फातिमा मशिदीला टाळे  
Next post गोरगरीब जनतेला   मोफत अंत्यसंस्कार व्यवस्था:आ. अभय पाटील