गोरगरीब जनतेला मोफत अंत्यसंस्कार व्यवस्था:आ. अभय पाटील
बेळगाव :
सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. गोरगरीब जनतेला अंत्यविधीचा खर्चही परवडेनासा झाला आहे.याकडे लक्ष देऊन बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने कोल्हापूरच्या पॅटर्नवर बेळगावात मोफत अंत्यविधी व्यवस्था करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.
बेळगावच्या शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत शेणी गोवऱ्यांवर मोफत अंत्यसंस्कार व्यवस्था सुरू करण्यात येणार,अशी माहिती शहर दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी दिली.
आ. अभय पाटील यांनी रविवारी शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीला भेट दिली. आ. अभय पाटील यांनी यावेळी शहापूर स्मशानभूमीच्या विकास कामांसंदर्भात मुक्ती धाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने सेवाभावी पणे हाती घेण्यात आलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.त्याचबरोबर स्मशानभूमीतील समस्यांची माहिती घेतली.