बेळगाव महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुक लवकर जाहीर..सरकारकडून ग्रीन सिग्नल
अखेर बेळगाव महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीला सरकारने ग्रीन सिग्नल दिला आहे.या संदर्भात नगरविकास विभागाच्या अधिन सचिवांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांना 9 तारखेला पत्र दिले.
21 व्या कार्यकाळासाठी शासनाने यापूर्वी निश्चित केलेल्या आरक्षणानुसारच, नियमानुसार निवडणुका घ्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार बेळगाव महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी तर उपमहापौरपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे.
प्रादेशिक आयुक्त उद्या दि. 11 तारखेला, महापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे.
आमदार अभय पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच 9 तारखेलाच तारीख निश्चित केली जाईल, असे सांगितले होते,त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या दिवशीच प्रत्यक्ष निवडणुकीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.