मध्यवर्ती बसस्थानकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मध्यवर्ती बसस्थानकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

बेळगाव :

शहरातील मध्यवर्ती बसस्थानक सहा – सात वर्ष बांधले जात आहे.अनेक कारणांमुळे विलंब आणि कामात अडथळे आले.आता बेळगाव बसस्थानक नवीन इमारत असून सर्व काही स्वच्छ आहे

 

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बसस्थानकाचे उद्घाटन करून म्हणाले माझ्या कारकिर्दीची सुरुवातील  काही दिवसां पुण्याहून  बेळगावला प्रवास करत होतो.या बसस्थानकाची दुरवस्था झाली होती,मी ते पाहिले आहे.

येत्या काही दिवसांत हुबळी ते बेळगाव ते बेंगळुरू वंदे भारत ट्रेनचा विस्तार होणार आहे असे सांगितले.

बेळगावी जिल्हा प्रभारी मंत्री गोविंदा काराजोला 32 कोटींच्या अनुदानातून बांधलेले हे बसस्थानक स्वच्छ व नीटनेटके आहे.ते सुंदर ठेवण्याची जबाबदारी जनतेची आहे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आ. अनिल बेनाके म्हणाले, हे माझे  एक स्वप्न आणि एक महत्त्वाचा प्रकल्प होता.

अनेकवेला  या समस्येवर वाहतूक मंत्र्यांनी ,मुख्यमंत्र्यांकडे हा मुद्दा मांडलं होतो आम्हाला बसस्थानक उपलब्ध करून देण्यात आले ह्या बद्दल खूप आनंद होतो.

यावेळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, राज्यसभेचे सदस्य एरण्णा काडादी, नगरविकास मंत्री बैराती बसवराजू,बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील, रायबाग आमदार दुर्योधन ऐहोळे, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटागीमठ, रस्ते वाहतूक महामंडळाचे हुबळी केंद्र कार्यालयाचे उपाध्यक्ष डॉ.बसवराज काळेगर उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post हेडा बंधूं विरुद्ध एफआयआर , राधेश्याम हेडा फरार….
Next post आ. अभय पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे वैश्‍यवाणी बांधवांना मिळणार जातीचा दाखला