आ. अभय पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे वैश्यवाणी बांधवांना मिळणार जातीचा दाखला
बेळगाव : प्रतिनिधी
वैश्यवाणी बांधवांना जातीचा दाखला मिळत नसल्याने अनेक सरकारी व इतर कामांना दाखल्या अभावी वैश्यवाणी बांधवांना समस्येला सामोरे जावे लागत होते.
त्यासाठी बेळगाव आ. अभय पाटील यांच्या सहकार्याने बेंगलोर येथे मुख्यमंत्री व महसूल विभागाचे प्रधान सचिव एन. जयराम यांच्याशी सतत पाठपुरवठा केला होता. आता वैश्यवाणी बांधवांना बेळगाव येथील अधिवेशन नंतर जातीचा दाखला देण्याचे आश्वासन एन. जयराम यांनी मंगळवारी केले आहे.
तर यावेळी श्री समादेवी संस्थानाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतडकर, वैश्ययुवा संघाचे अध्यक्ष रोहन जुवळी, उपाध्यक्ष प्रवीण पिळणकर व सचिव रवी कलघटगी उपस्थित होते.
हे काम आ. अभय पाटील यांच्या प्रयत्नातून होत असल्याने त्यांचे वैश्यवाणी बांधवांकडून आभार आणि कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.