गणेश चतुर्थीची तयारीचे महापौर शोभा सोमण्णाचे कडून पाहाणी.
बेळगाव, सीमावर्ती भागातील बेळगावात आता श्रीगणेशाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग संयुक्तपणे सर्व तयारी करत आहेत.तर दुसरीकडे महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती व नगर सेवकांच्या उपस्थितीत खबरदारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली.
गुरूवारी सकाळी महापौर शोभा सोमण्णाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, नगररचना व विकास स्थायी समिती सभापती वाणी विलास जोशी, महसूल स्थायी समिती सभापती वीणा विजापुरे, नितीन जाधव, अभिजित जावळकर, सत्तारूढ पक्षनेते राजशेखर डोणी आदींनी गणेश मंडळांसमवेत रस्ता भेट दिली आणि पाहणी केली.