रिंगरोडसाठी पुन्हा ‘नोटिफिकेशन

रिंगरोडसाठी पुन्हा ‘नोटिफिकेशन

बेळगाव :

रिंगरोडसाठी पुन्हा एका इंग्रजी व कन्नड दैनिकांमधून नोटिफिकेशन देण्यात आले असून शेतकऱ्यांनी 21 दिवसांच्या आत आपले पुन्हा म्हणणे मांडावे, असे या नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. बेळगाव तालुक्यातील अगसगा, कडोली, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी, कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, बाची, बेळगुंदी, बिजगर्णी, नावगे, संतिबस्तवाड, बहाद्दरवाडी, वाघवडे, झाडशहापूर या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत हे नोटिफिकेशन दिले आहे. एकूण 69.387 कि.मी. साठी ही नोटिफिकेशन देण्यात आली आहे. त्यासाठी 499 एकर जमीन घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार असून शेतकऱ्यांना 21 दिवसांच्या आत आपल्या कागदपत्रांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्याल उपस्थित राहून म्हणणे मांडावे लागणार आहे.

यापूर्वी जे नोटिफिकेशन देण्यात आले होते, त्यामधील शेतकऱ्यांनी कागदपत्रे व हरकती नोंदविल्या होत्या. मात्र आता पुन्हा नव्याने काही सर्व्हे क्रमांकांसह हे नोटिफिकेशन असून शेतकऱ्यांना 21 दिवसांच्या आत आपली कागदपत्रे हजर करावी लागणार आहेत. नव्याने देण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये 16 गावांतील जमिनींबाबतच उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे इतर 16 गावांतील जमिनींबाबत कोणताच उल्लेख करण्यात आला नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

विशेष भूसंपादन अधिकारी व प्रांताधिकारी बलराम चव्हाण यांनी ही नोटिफिकेशन दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्वी दिलेल्या नोटिफिकेशनपेक्षाही अधिक जमीन घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा लढा द्यावा लागणार, हे निश्चित आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १३ वर्षांची तुरुंगवास..!
Next post पहिल्या अग्निवीर तुकडीचा शानदार दीक्षांत समारंभ संपन्न