आ.अभय पाटील यांच्या उपस्थितीत येळ्ळूर ग्रामपंचायत नूतन अध्यक्षा सौ.लक्ष्मी भरत मासेकर यांचे सत्कार
बेळगाव प्रतिनिधी
येळ्ळूर ग्रामपंचायत नूतन अध्यक्षा सौ लक्ष्मी भरत मासेकर यांचे सत्कार आज गुरुवारी आ.अभय पाटील यांच्या उपस्थितीत महापौर सौ. शोभा सोमंनाचे यांच्या हस्ते करण्यात आला.
येळ्ळूर ग्राम पंचायत वर ग्राम विकास आघाडी, येळ्ळूरचे भगवा फडकलेला आहे. आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्राम विकास आघाडीचे सदस्यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक पार पडले आहे . ग्राम विकास आघाडी,येळ्ळूर व समिती अशा दोन गटात चुरस लागलेली होती . अध्यक्षपदासाठी सौ लक्ष्मी भरत मासेकर यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी चुरशीचे लढत झाली.
सत्कार कार्यक्रमाला येळ्ळूर ग्रामपंचायत नुतन अध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर, ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील, शशी धुळजी, कलापा मेलगे, प्रदीप सुतार, सुनील अरळीकटी नारायण काकतकर, शिवाजी मानकोजी ,भरत मासेकर ,सौ. राजकुंवर पावले, शांता काकतकर ,रेणुका मेलगे, शांता मासेकर , व लक्ष्मी कणबरकर उपस्थित होते.