आ.अभय पाटील यांच्याकडून जागतिक कीर्तीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रध्दांजली
बेळगाव :
आ.अभय पाटील यांनी जागतिक कीर्तीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना श्रध्दांजली सभा आयोजन केले होते.नितीन देसाई आणि त्यांचे जवळचे संबंध होते. सुरुवातीला एक मिनिट मौन पाळून, नंतर पुष्प अर्पण करून श्रध्दांजली वाहिले.
आ.अभय पाटील म्हणाले की जागतिक कीर्तीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत (महाराष्ट्र) येथे आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येची बातमी आज बुधवारी समजताच बेळगावातील त्यांचे असंख्य चाहते आणि हितचिंतकांना मोठा धक्का बसला आहे.
नितीन देसाई हे वारंवार बेळगावला येत होते. त्यांचे बेळगावशी जिव्हाळ्याचे नाते होते. राजा शिवछत्रपती मालिकेनंतर प्रथमच बेळगावला आल्यानंतर त्यांचे बेळगावमध्ये चाहते वाढले एक प्रकारची क्रेझही होती. विशेष म्हणजे व्हॅक्सीडेंट डेपोचा जो विकास सुरू आहे. त्या ठिकाणी जी एव्हिएशन गॅलरी आणि ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडवणारा प्रकल्प बनवण्यात येत आहे. त्याच्या कामाचे कंत्राट नितीन देसाईंच्या कंपनीकडेच होता. त्यामुळे त्यांचे वारंवार बेळगावला येणे-जाणे होते. त्यांच्या आत्महत्येमुळे बेळगाववासियांना धक्का बसला आहे.
या वेळी महापौर शोभा सोमंनाचे, प्रतिष्ठीत नागरिक योगी बिरादार, नगर सेवक नितीन जाधव,जयंत जाधव,राजू भातकांडे, नगरसेविका सारिका पाटील, इतर नगरसेवक आणि कार्यकर्ता उपस्थित होते.