महिला पतंजली योग समितीतर्फे जडी बुटी दिन साजरा

महिला पतंजली योग समितीतर्फे जडी बुटी दिन साजरा.

बेळगाव:

बेळगाव महिला पतंजली योग समितीतर्फे आज ४ ऑगस्ट रोजी परमपूज्य आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा जन्मदिन जडी – बुटी दिवसांच्या स्वरूपात साजरा केला गेला.या कार्यक्रमासाठी पतंजली , उतर कर्नाटक राज्य प्रभारी आरती कानगो यांच्या मार्गदर्शनाखाली महिला वर्गाने स्वतः तयार केलेली औषधी वनस्पती ची रोपे आणली होती.

ही रोपे नागरिकामध्ये विनामुल्य वितरण करण्यात आले.याप्रसंगी आरती कानगो नी वेगवेगळ्या औषधी वनस्पती ची नावे सांगत त्यांचा कोणकोणत्या रोगांवर औषध म्हणून उपयोग केला जातो याची माहिती दिली.पतंजली महिला योग समिती ने या पूर्वी ही असे बरेचसे उपक्रम हाती घेतले आहेत.

५० हून अधिक ठिकाणी मोफत योगवर्ग घेतले जातात.योगासना बरोबर प्राणायाम,यज्ञ आणि प्राचीन चिकित्सा पद्धत शिकविले जातात.पतंजली नेहमीच स्वदेशी चा पुरस्कार केला आहे.परमपूज्यश्री रामदेव स्वामीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली रोगमुक्त भारत व रोगमुक्त विश्र्व हि चळवळ पतंजली ने सुरु केली आहे.

कार्यक्रमाला योगगुरू अमरेंद्र कानगो,सराफ काॅलनी तील पार्वती भांतकाडे,शोभा नौकुडकर , वैशाली भारती,नागरमुनोळी दांपत्य. पटवर्धन ले आऊट मधून विद्या तोपिनकट्टी, वृंदा तडकोड, नंदिनी चौगुले,गायत्री अडके , वनिता पाटील आणि पारिजात काॅलनी मधून शाम जोशी व संगिता जोशी आणि इतर बरेच योग साधक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आ.अभय पाटील यांच्या उपस्थितीत येळ्ळूर ग्रामपंचायत नूतन  अध्यक्षा सौ.लक्ष्मी भरत मासेकर यांचे सत्कार
Next post कंग्राळी खुर्दमध्ये भरदिवसा घरफोडी