खा. मंगला अंगडी आणि बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या उपस्थितीत औद्योगिक विकसनासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन.
बेळगाव प्रतिनिधी
औद्योगिक क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे आता डिजिटल औद्योगिक क्रांतीचे पर्व सुरू झाले आहे असे विचार कर्नाटक राज्य मॅकेनिकल बोर्डचे अध्यक्ष डॉ. एन. टी. रंगारेड्डी यांनी व्यक्त केले. दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स बेळगाव शाखा, बेळगाव फौंड्री क्लस्टर आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन या संस्थांच्या वतीने दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख मार्गदर्शक या नात्याने बोलताना रंगारेड्डी यांनी औद्योगिक प्रगतीचा आढावा घेतला. उद्यमबाग येथील बेळगाव फौंड्री क्लस्टरच्या सभागृहात राष्ट्रीय परिषद सुरु झाली आहे. याचे उद्घाटन खा. मंगला अंगडी आणि बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रामध्ये आता झपाट्याने बदल होत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रणाली यांचा वापर वाढला आहे. यासंदर्भात तज्ज्ञमंडळींचे मार्गदर्शन असणाऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये औद्योगिक प्रगतीच्या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. परिषदेचे आयोजन केलेल्या दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचे अध्यक्ष रमेश जंगल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर बेळगाव फौंड्री क्लस्टरचे अध्यक्ष राम भंडारे , सचिव सदानंद हुंबरवाडी आदी उपस्थित होते. परिषदेचे निमंत्रक विलास बदामी यांनी प्रास्ताविक केले. परिषदेमध्ये विविध