आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे

आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे

बेळगाव :

आयजीपी विकास कुमार यांनी स्वीकारली अधिकार सूत्रे बेळगाव उत्तर आयजीपी पदाची अधिकार सूत्रे विकास कुमार यांनी आज स्वीकारली. प्रारंभी आयजीपी कार्यालयाच्या आवारात नूतन आयजीपी विकास कुमार यांना मानवंदना देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. वरिष्ठ पोलीस संजीवकुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, राज्य सरकारच्या आदेशानुसार आज उत्तर आयजीपीची सूत्रे मी स्वीकारलो आहे. बेळगाव आपल्याला नवीन नसून २००५ साली प्रोबेशनरी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.

पाच जिल्ह्यांचा समावेश उत्तर विभागात असून अधिकाऱ्यांच्या सहकार्याने कायदा सुव्यवस्था सुरक्षित राखण्यात प्राधान्यता देण्यात येईल. पोलीस विभागात या ५-१० वर्षात अनेक बदल झाले असून पोलीस आता जनस्नेही बनले आहेत. संपूर्ण राज्यातील पोलीस व्यवस्थेत बदल घडला असून जनस्नेही बनून काम करण्यात येत आहे.

विजापूर जिल्ह्यात देखील आपण गुन्हेगारीवर आळा घालण्यास तत्पर आहोत तसेच कृष्णा नदीकाठी चाललेल्या अवैध वाळू उपसा संबंधी माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. जनतेची सुरक्षा आणि जनस्नेही कशा पद्धतीने काम करता येईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात येईल तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात येईल असे ते म्हणाले.या प्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post पाण्याचा समस्या बाबतीत महामंडळाचे नूतन आयुक्तांची चर्चा
Next post SFS बेळगाव येथे रु. 250 कोटी युनिट उभारण्यास इच्छुक, 30 एकर जमीन मागितली.