SFS बेळगाव येथे रु. 250 कोटी युनिट उभारण्यास इच्छुक, 30 एकर जमीन मागितली.
बेंगळुरू :
मोबाईल घटक उत्पादक, SFS रु. 250 कोटींची गुंतवून युनिट स्थापन करण्यास इच्छुक आहे.बेळगावमध्ये 30 एकर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मागणी सरकारकडे केली आहे.
फरास शॉ , कंपनीचे CFO यांच्या नेतृत्वाखाली SFS प्रतिनिधींनी,उद्योग मंत्री एम बी पाटील, यांची भेट घेतली. त्यांच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत विचार विनिमय करण्यासाठी त्यांची भेट घेतल्यानंतर मोठ्या व मध्यम उद्योग मंत्री एम बी पाटील यांनी बुधवारी ही माहिती दिली .
प्रस्तावाचे स्वागत करून मंत्र्यांनी प्रस्तावाचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगितले.SFS ने बेळगाव येथे आधीच एरोस्पेस घटक युनिट स्थापन केले आहे आणि ते कार्यरत आहे.
ऍपल सारख्या कंपन्यांसाठी मोबाईल घटकांची निर्मिती करणारी कंपनी बेळगाव येथे आपले युनिट स्थापन करण्यास इच्छुक आहे.येत्या तीन वर्षांत तंत्रज्ञांसाठी 500 थेट नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
एसएफएसचे संचालक प्रशांत कोरे आणि इंडस्ट्रीज विभागाचे आयुक्त गुंजन कृष्णा उपस्थित होते.