पाण्याचा समस्या बाबतीत महामंडळाचे नूतन आयुक्तांची चर्चा
बेळगाव,
महामंडळाचे नूतन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सीमावर्ती बेळगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या गांभीर्याने घेतली असून, अनेक उपाययोजना करत आहेत.
पदभार स्वीकारताच ते स्वस्थ बसले नाहीत, त्यांनी आज पहाटे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीशी दीर्घ चर्चा केली.एवढेच नाही तर बेळगावच्या जनतेसाठी कोणत्याही परिस्थितीत पाण्याची समस्या होऊ नये असे काळजी घेतली पाहिजे.अनावश्यकपणे पाणी नुकसान टाळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
त्याच्याकडून येथील पाणीपुरवठ्याची माहिती घेतल्यानंतर ते तेथून राकसाकोप्पाला गेले त्यांनी जलाशयाला भेट दिली.