आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने बेळगाव उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा..

आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने बेळगाव उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा.

 

बेळगाव:
बेळगाव जिल्ह्यातील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने ,आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून जिल्ह्याच्या विकासासंबंधी ,आणि इतर विविध विषयांवर चर्चा केली.


आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाच्या चर्चेदरम्यान नगरविकास मंत्री बी.ए बसवराज, राज्यसभा सदस्य एरण्णा काडादी,मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव एन.
मंजुनाथ प्रसाद,वाणिज्य व उद्योग विभागाचे मुख्य सचिव डॉ. ई.व्ही. रमण रेड्डी आणि शासनाचे इतर वरिष्ठ अधिकारी,
भरत देशपांडे , सचिन सबनीस,रोहन जु व ळी, आनंद देसाई, आदित्य पारक, रोहीत देशपांडे, सतीश पाटील, माधव चौगुले व इतर उपस्थित होते.


बेळगावात हाय टेक पार्कचे बांधकाम केले जाईल,फाउंड्री आणि हायड्रोलिक्ससाठी 500 एकर स्वतंत्र औद्योगिक वसाहत दिली जाईल.

ऑटोमोबाईल बेस इंडस्ट्री आणली जाईल आणि बेळगावातील अधिवेशन सत्रादरम्यान महत्त्वाच्या लोकांसोबत २तास
बेळगावच्या विकासावर मुख्यमंत्र्यांंशी चर्चा होईल
असे वचन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post विजय हजारे ट्रॉफी: प्री-क्वार्टर फायनलमध्ये रोनितच्या हल्ल्यात राजस्थान कोसळले
Next post आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने बेळगाव उद्योजकांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा.