माजी मंत्री डी. बी. इनामदार यांचे निधन
बंगळुरू :
माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. बी.इनामदार यांचे निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून प्रकृतीचा त्रास असलेल्या इनामदार यांच्यावर मनिअल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार निष्फळ ठरल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
डी. बी. इनामदार यांना फुफ्फुस आणि यकृताचा त्रास होता. या पार्श्वभूमीवर त्यांना बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कित्तूर विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आलेले आमदार इनामदार यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री म्हणून काम केले.