बेळगाव :
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजप चे अधिकृत उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात झाली असून शिवाजी कॉलनी येथे जोरदार प्रचार करण्यात आला.
यावेळी सदर गावातून अभय पाटिल यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला.प्रारंभी संध्याकाळी ठीक ७ वा. प्रचाराला सुरुवात करण्यात आली. गावातील गल्लोगल्ली प्रचार फेरी काढून मतदारांना आपल्या योजनांबाबत माहिती देवून मतदानाचे आवाहन करण्यात आला.तसेच याचे प्रतिबिंब त्यांच्या प्रचार मोहिमेतून उमठत होती.
हिंदवाडी ,टिळकवाडी या भागातील पाणीपुरवठ्यासाठी मागील अनेक वर्षात योग्य नियोजन झाले नव्हते. आता यापुढील काळात ते करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे .तसेच अनगोळ नाक्या येथे मोठ्या टाकीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. या माध्यमातून दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कार्यक्रमांची माहिती दिली.आगामी निवडणुकीत मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन करण्यात आले.
या निवडणुकीत अभय पाटील यांनाच प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला